हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हा ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ प.पू. श्री महंत भैयाजी महाराज

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….

ऑक्सिजनच्या अभावामुळे मुंबई महापालिकेने तातडीने रुग्णालयातील १६८ रुग्णांना रातोरात अन्य रुग्णालयांत हालवले !

पुरवठादारांकडून वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे १७ एप्रिलच्या रात्री १६८ रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये तातडीने हालवण्यात आले.

चीन सरकार लोकांना लस घेण्यासाठी देत आहे अंडी आणि शॉपिंग कुपन !

चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्‍वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे.

चिनी सैन्याचा हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथून माघार घेण्यास नकार

चीन विश्‍वसघातकी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चिनी सैन्याने जरी माघार घेतली असती, तरी त्याने परत अधिक गतीने भारतात घुसखोरी केली असती ! यामुळेच चीनपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्यक !

‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय !

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक परीक्षेच्या १५ दिवस आधी घोषित केला जाणार आहे.

देहलीत स्मशानभूमीमध्ये जागा नसल्याने वाहनतळाच्या भूमीवर १५ जणांचे अंत्यसंस्कार

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २ लाख ६१ सहस्र ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १ सहस्र ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहडोल (मध्यप्रदेश) येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू !

सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

संचारबंदीचा कालावधी संपल्यावर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१ मेनंतर राज्यात कोरोनाची परिस्थिती काय असेल, त्यावर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास ती वाढवली जाईल, असे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ एप्रिल या दिवशी येथे केले.

जळगाव येथील रुग्णालयातून कोरोनाबाधित मृतदेह चादरीत गुंडाळून नातेवाइकांच्या कह्यात !

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह स्वतंत्र प्लास्टिक पिशवीत (बॉडी रॅपिंग बॅग) नातेवाइकांच्या कह्यात देणे बंधनकारक असतांना १६ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील साधना रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण चादरीत गुंडाळून नातेवाइकांच्या कह्यात देण्यात आला.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !