इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांना अडकवणार्‍या अधिकार्‍यांची सीबीआय चौकशी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नंबी नारायणन् यांच्यावर क्रायोजेनिक इंजिनच्या संदर्भातील माहिती विदेशांना पुरवल्याचा खोटा आरोप करून त्यांना अटक करून त्यांचा छळ करण्यात आला होता.

संपूर्ण देहलीत आता केवळ १०० पेक्षा अल्प आयसीयू खाटा उपलब्ध ! – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

गेल्या २४ घंट्यांमध्ये देहलीमध्ये २४ सहस्रांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. यावरून कोरोनाचा संसर्ग किती गतीने वाढत आहे, याचा अंदाज येत आहे. देहलीमध्ये रुग्ण सापडण्याचा दर वाढून ३० टक्के झाला आहे. एका दिवसापूर्वी तो २४ टक्के इतका होता.

पू. भिडे गुरुजी यांचे कार्य प्रेरणादायी ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्‍यांना दिलेली शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.

हरिद्वार कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवसांचे सक्तीचे गृह अलगीकरण ! – देहली सरकारचा आदेश

देहली सरकारने ४ ते १७ एप्रिल या कालावधीत हरिद्वार कुंभमेळ्यात उपस्थित राहून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे न करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

आज कळंबोली रेल्वे स्थानकावरून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणम् येथे रवाना होणार !

कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनचा महाराष्ट्रात सर्वत्र तुटवडा जाणवत आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन आता प्रधानमंत्री जन-आरोग्य केंद्रावरही स्वस्तात उपलब्ध !

सध्या देशात कोरोना महामारीवर लाभदायक ठरणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. हे औषध वैद्यकीय दुकानात भरमसाठ किमतीत विकण्यात येत आहे. अशा तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. आता शासनाने हे इंजेक्शन प्रधानमंत्री जन-आरोग्य केंद्रावरही स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे

मध्यप्रदेश येथे मंदिरातून परतणार्‍या दोघा मुलींवर धर्मांधाकडून बलात्कार

मंदिरात कन्या भोज करून घरी परतणार्‍या दोघा अल्पवयीन मुलींवर रफीक खान याने बलात्कार केला.

सातारा जिल्ह्यात अश्‍लील ध्वनिचित्रीकरण दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जावळी तालुक्यातील एका ६ वर्षांच्या मुलीला खाऊचे आमीष दाखवत अश्‍लील ध्वनिचित्रीकरण दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १४ दिवस कडक ‘जनता कर्फ्यू’ करू ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून सर्व पातळीवर प्रयत्न केले जातील. तरीही वाढणारी साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चा एकमेव पर्याय आहे.

‘रेमडेसिविर’चा साठा केल्यावरूनच ‘ब्रुक फार्मा’च्या अधिकार्‍यावरील पोलिसांच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा !

पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजेश डोकानिया यांना विलेपार्ले येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हेही तेथे आले. या ठिकाणी पोलिसांसमवेत त्यांचा शाब्दिक वाद झाला.