वणी (यवतमाळ) येथे मद्याऐवजी ‘सॅनिटायझर’ प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू !

जैताईनगर आणि अन्य एका भागातील ७ जण मद्याऐवजी ‘सॅनिटायझर’ प्यायले. त्यामुळे त्यांचा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. मद्याऐवजी त्यांनी ‘सॅनिटायझर’च्या माध्यमातून नशा मिळवण्याचा प्रयत्न केला.

मलंगगडाच्या पायथ्याशी घातक रसायनांच्या पिंपांची विल्हेवाट, ४ जणांना अटक

घातक रसायनांच्या पिंपांची अनधिकृतरित्या विल्हेवाट लावून लोकांच्या जिवाशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्यास पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही !

भयावर मात करून सध्याच्या भयावह संकटाला सामोरे जाणे ही आपल्या गुरुभक्तीची कसोटी ! – पू. प्रमोद केणे, दत्त संप्रदाय

सध्याचा काळ हा अत्यंत कठीण, भयावह आणि कोरानारूपी भस्मासुराने व्याप्त आहे. चहूबाजूला मृत्यूचे थैमान चालू आहे. संपूर्ण विश्‍व या महामारीमुळे त्रस्त आहे. तरीही भयभीत होऊ नका. धीर सोडू नका. ईश्‍वरावरील असीम निष्ठेची ही कसोटी आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने दोघांचा मृत्यू !

ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या मुख्य कॉकपर्यंत अज्ञात व्यक्ती जाते कशी ? यासाठी काही सुरक्षा कशी नाही ? या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन !

खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा ………

अमरावती येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या वाहनातून ३१ लाख ३० सहस्रांचा मुद्देमाल जप्त !

चांदूरबाजार तालुक्याच्या अंतर्गत येणार्‍या बहिरम तपासणी नाक्याच्या ठिकाणी वाहनात निर्दयीपणेे कोंबलेल्या ६२ गोवंशियांसह ३१ लाख ३० सहस्रांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कल्याण येथील कोविड केंद्राच्या १५ व्या मजल्यावरील स्नानगृहाच्या खिडकीतून २ धर्मांध बंदीवान पसार, ४ पोलीस निलंबित

धर्मांध बंदीवान प्रसाधनगृहात जातांना पळून जाऊ शकतात, ही शक्यता लक्षात न घेता पोलिसांनी निष्काळजीपणा का केला ?

यवतमाळ येथे बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसंदर्भातील तक्रारींच्या निवारणार्थ नियंत्रण कक्ष कार्यान्वित !

 बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, बियाणे आस्थापनांचे प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारी यांचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी माथाडी कामगारांचे कामबंद आंदोलन

राज्यशासनाने माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना कामावर येण्यासाठी रेल्वे आणि बसने प्रवास करण्याची अनुमती द्यावी, या मागणीसाठी २४ एप्रिलला राज्यातील सहस्रो माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला.

नागपूर येथे अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ ! 

केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई येथील निवासस्थानासह राज्यातील १० ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.