वणी (यवतमाळ) येथे मद्याऐवजी ‘सॅनिटायझर’ प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू !

वणी (यवतमाळ), २४ एप्रिल (वार्ता.) – येथील जैताईनगर आणि अन्य एका भागातील ७ जण मद्याऐवजी ‘सॅनिटायझर’ प्यायले. त्यामुळे त्यांचा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. मद्याऐवजी त्यांनी ‘सॅनिटायझर’च्या माध्यमातून नशा मिळवण्याचा प्रयत्न केला.