कल्याण येथील कोविड केंद्राच्या १५ व्या मजल्यावरील स्नानगृहाच्या खिडकीतून २ धर्मांध बंदीवान पसार, ४ पोलीस निलंबित

धर्मांध बंदीवान प्रसाधनगृहात जातांना पळून जाऊ शकतात, ही शक्यता लक्षात न घेता पोलिसांनी निष्काळजीपणा का केला ?

ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – कल्याण येथील आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगणार्‍या ३० बंदीवानांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. कल्याण-भिवंडी मार्गावर असलेल्या राजणोली नाका बायपास येथील टाटा आमंत्रा कोविड केंद्रात गाजीदारा जाफरी (वय २५ वर्षे) खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय ३३ वर्षे) या २ धर्मांध बंदीवानांवर उपचार चालू होते. या गोष्टीचा अपलाभ घेत दोघांनी १५ व्या मजल्यावरील स्नानगृहाच्या खिडकीच्या काचा काढल्या आणि जलवाहिनीवरून खाली येत पळ काढला. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात २ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, तर या ठिकाणी असलेल्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.