देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !

४ आठवड्यांपूर्वी भारतात प्रतिदिन सरासरी १ लाख ४३ सहस्र ३४३ नवे रुग्ण आढळत होते; मात्र आता प्रतिदिन साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

जगमोहन यांनी दोन वेळा जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भूषवले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीयमंत्रीही होते.

उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाची सरशी

विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

टाटा समूह कोरोना संकटाशी लढण्यासाठी २ सहस्र कोटी रुपये व्यय करणार

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोना संकटाशी लढण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे.

२ मास विनामूल्य शिधा, तर रिक्शा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे साहाय्य !

दळणवळण बंदीमुळे देहली सरकारचा निर्णय !

कोरोनाच्या विरोधातील युद्धाचे दायित्व नितीन गडकरी यांना द्या !  

इस्लामी आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद यांना भारत पुरून उरला. त्याप्रमारणे कोरोना महामारीलाही भारत सामोरे जाईल. आता कडक उपाययोजना न केल्यास आपल्याला आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल.

बेंगळुरू महापालिकेच्या कोविड वॉर रूममध्ये एकाच समुदायाचे लोक का ? – तेजस्वी सूर्या यांचा प्रश्‍न

येथील महानगरपालिकाच्या कोविड वॉररूममध्ये मुसलमान सदस्यांची नियुक्त केल्यावरून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या वेळी टीका केली. या वेळी त्यांनी  ‘कोविड वॉररूम’साठी नेमणूक करण्यात आलेल्या १७ लोकांच्या सूचीतील नावे वाचून दाखवली.

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाच्या विसंगत आदेश निर्गमित

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला विसंगत पत्र सिद्ध करून ते प्रसिद्ध केले आहे. सध्या ते सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून कोरेगावातील विविध प्रसिद्धीगटांमध्ये फिरत आहेत.

पंचायत निवडणूक जिंकल्यानंतर धर्मांधांकडून माजी हिंदु सरपंचाच्या घरात घुसून गोळीबार

धर्मांधांच्या हाती अधिकार आल्यावर काय होते, हे यातून दिसून येते. हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत, हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा अल्प नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केली.