जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

जगमोहन मल्होत्रा

नवी देहली – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा यांचे प्रदीर्घ आजाराने येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आदींनी ट्वीट करत त्यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले. जगमोहन यांनी दोन वेळा जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भूषवले.

या काळात त्यांनी आतंकवादी कारवायांना चाप लावला. त्यामुळे त्यांचा तेथे दरारा निर्माण झाला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीयमंत्रीही होते. आणीबाणीच्या काळात काँग्रेस नेते संजय गांधी यांनी देहलीमध्ये सौंदर्यीकरणाचे दायित्व जगमोहन यांना दिले होते. ते देहली विकास प्राधिकरणाचे संचालक होते. त्या वेळी त्यांनी जामा मशीद भागातील झोपड्यांवरही कारवाई केली होती.