कोरोनाच्या विरोधातील युद्धाचे दायित्व नितीन गडकरी यांना द्या !  

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची  पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

डावीकडून खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – इस्लामी आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद यांना भारत पुरून उरला. त्याप्रमारणे कोरोना महामारीलाही भारत सामोरे जाईल. आता कडक उपाययोजना न केल्यास आपल्याला आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल. ही लाट लहान मुलांना लक्ष्य करू शकते; म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विरोधातील युद्धाचे दायित्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावे. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून रहाणे निरुपयोगी आहे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे.