नवी देहली – टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोना संकटाशी लढण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी २ सहस्र कोटी रुपये खर्च करणार आहे. जानेवारी ते मार्च या ३ मासांत टाटा समूहाला जो लाभ झाला, त्याच रकमेतून ही रक्कम खर्च करणार आहे. तसेच टाटा समूह लस उत्पादक आस्थापनांशी करार करण्याचा विचार करत आहे.