पंचायत निवडणूक जिंकल्यानंतर धर्मांधांकडून माजी हिंदु सरपंचाच्या घरात घुसून गोळीबार

एका महिला ठार, तर दोघे घायाळ

धर्मांधांच्या हाती अधिकार आल्यावर काय होते, हे यातून दिसून येते. हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

आजमगड (उत्तरप्रदेश) – येथील इशहाकपूर गावामध्ये मागील पंचायत निवडणुकीचा सूड उगवण्यासाठी विजय झालेल्या धर्मांध सरपंचाने त्याच्या धर्मांध साथीदारांसह माजी सरपंच रामअवध राजभर यांच्या घरात घुसून गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या घायाळ झाले. वर्ष २०१०च्या निवडणुकीत रामअवध राजभर यांनी फैज याला पराजित केले होते. या वेळी फैज याने समर्थन दिलेल्या उमेदवाराने राजभर यांचा पराभव केला. त्यानंतर धर्मांधांनी राजभर यांच्या घरात घुसून गोळीबार केला. हत्येच्या घटनेनंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.