बेंगळुरू महापालिकेच्या कोविड वॉर रूममध्ये एकाच समुदायाचे लोक का ? – तेजस्वी सूर्या यांचा प्रश्‍न

मध्यभागी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या

बेंगळुरू – येथील महानगरपालिकाच्या कोविड वॉररूममध्ये मुसलमान सदस्यांची नियुक्त केल्यावरून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या वेळी टीका केली. या वेळी त्यांनी  ‘कोविड वॉररूम’साठी नेमणूक करण्यात आलेल्या १७ लोकांच्या सूचीतील नावे वाचून दाखवली. त्या सूचीत केवळ एकाच समुदायाच्या लोकांची नावे पाहून त्यांनी आक्षेप घेतला. या वेळी आमदार रवि सुब्रह्मण्यम्, सतीश रेड्डी आणि उदय गरुडाचार यांनीही याला दुजोरा दिला.

१. सूर्या यांनी विचारले की, हे सर्व कोण आहेत ?, त्यांची नेमणूक करण्यासाठी कोणते मापदंड लावले ? त्यांची कुणी नेमणूक केली ? त्या यंत्रणावाल्यांना बोलवा.

२. आमदार रवि सुब्रह्मण्यम् यांची विचारले की, या नेमणुका मदरशासाठी केल्या आहेत कि महानगरपालिकेसाठी ?

३. आमदार सतीश रेड्डी यांनी, ‘हे सोडून तुम्हाला इतर कुणी मिळाले नाहीत का?’, असा प्रश्‍न विचारला.