सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या याचिकेवर ३ ऑगस्ट या दिवशी सुनावणी !

शिवसेना पक्षावर कुणाचा दावा खरा आहे, हे पहाण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गट यांला नोटीस बजावली होती. या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली आहे.

२ ऑगस्ट या दिवशी अधिवक्ता कै. गोविंद गांधी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आदरांजली सभा !  

२ ऑगस्ट २०२२ या दिवशी अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता कै. गोविंद गांधी यांचा प्रथम स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्या वतीने पुणे येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वाटप !

यामध्ये ३१४ अपंगांना कृत्रिम हात आणि पाय (जयपूर फूट), ‘व्हीलचेअर’ तसेच ‘ट्राय सायकल’ यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

दौंड (पुणे) येथील कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकार्‍याचे स्थानांतर !

राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी हा प्रकार घडल्याची चर्चा !

नागपंचमी सण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच साजरा करा ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल, तेथे जिल्हा प्रशासनाचे तातडीने साहाय्य घ्यावे, असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

वेंगुर्ला शहरातील एका ७/१२ वरील कायम कुळाचे नाव परस्पर काढले !

मनमानी कारभार करणार्‍या तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

अवैध बांधकाम आणि विनापरवाना चालू असणारे उपाहारगृह ‘सील’ !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांसह अन्य उपस्थित होते.

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे लोकसहभागातून बुजवले !

येथील रिक्शाचालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून हे खड्डे बुजवल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

पती शासकीय कर्मचारी असूनही पत्नींनी घेतला गृहआधार योजनेचा लाभ !

अशा प्रकारे योजना लाटणारे कर्मचारी शासकीय सेवेत तरी प्रामाणिक असतील का ?

काश्मीरविषयी पाककडून करण्यात येणारा प्रचार मोडून काढावा !

पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. खोर्‍यातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी तो इस्लामी खिलाफतची कल्पना पसरवत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जुन्या ठरावांचा वापर केला जात आहे.