आता युक्रेनकडूनही रशियाच्या सैनिकांवर अत्याचार !

युक्रेनच्या बुचा शहरामध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचा नरसंहार केल्याच्या घटनेनंतर आता युक्रेनच्या सैनिकांनीही रशियाला प्रत्युत्तर  दिले आहे. कीव येथील एका गावामध्ये पकडण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकांना अमानुषपणे ठार मारण्यात आले. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.

जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्‍वास घेत आहे ! – जागतिक आरोग्य संघटना

जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्‍वास घेत आहे. त्यामुळे श्‍वसनाच्या आजारांचा धोका वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये बहुतांश मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश आहे.

लोकशाही राष्ट्रांना मारक ठरणार्‍या चीनला ‘नाटो’ लक्ष्य करणार !

चीनने रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा निषेध न केल्याने ‘नाटो’ नाराज असल्याचे त्याचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले.

अमेरिकेची ‘अवज्ञा’ केल्याने इम्रान खान यांना मोजावी लागली किंमत ! – रशिया

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेची ‘अवज्ञा’ केल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागली, असा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने ‘खान यांचे सरकार उलथवण्यामागे विदेशी शक्तींचा (अमेरिकेचा) हात असल्या’चा खान यांचा दावा फेटाळून लावला.

फिनलँड आणि स्वीडन ‘नाटो’चे सदस्य बनण्याच्या प्रयत्नात !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे शेजारी देश फिनलँड आणि स्वीडन हेसुद्धा नाटोचे (‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’चे) सदस्य बनण्याच्या प्रयत्नात आहेत. फिनलँडला आशा आहे की, १५ एप्रिलपर्यंत या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.

जर्मनी आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर ! – डॉयचा बँक

युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे, असे आता तेथील मुख्य बँक ‘डॉयचा’चे म्हणणे आहे.

रशियाच्या सैनिकांकडून निरपराध नागरिकांच्या हत्या ! – युक्रेनचा आरोप

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या ४० व्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवरील भागापासून पुन्हा माघारी जात आहे; मात्र माघारी जातांना त्यांच्याकडून युक्रेनच्या नागरिकांच्या हत्या केल्याचे युक्रेनच्या सैनिकांना आढळून आले आहे.

जर्मनीने ३० वर्षांत गाठला महागाईचा उच्चांक !

कोरोना महामारी, तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीविषयी असलेली संभ्रमाची स्थिती यांमुळे जर्मनीत रहाण्याचा खर्च वाढला आहे. मार्च २०२२ चा महागाई दर हा गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी अधिक असू शकतो.

नवाज शरीफ यांच्या लंडनमधील कार्यालयावर आक्रमण

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लंडन येथील कार्यालयावर पुन्हा आक्रमण झाले आहे. २ दिवसांपूर्वीही त्यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्यावर आक्रमण झाले होते. आता १५ ते २० लोकांनी हे आक्रमण केल्याचे वृत्त आहे.

ब्रिटनमध्ये महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठण्याची शक्यता !

ब्रिटनमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठू शकतो, अशी शक्यता बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे.