मॉस्को (रशिया) – पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेची ‘अवज्ञा’ केल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागली, असा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने ‘खान यांचे सरकार उलथवण्यामागे विदेशी शक्तींचा (अमेरिकेचा) हात असल्या’चा खान यांचा दावा फेटाळून लावला. याचा ठोस असा कोणताच पुरावा नसल्याचे सैन्याचे म्हणणे आहे. दरम्यान पाकिस्तानी संसद विसर्जित केल्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या विरोधात तेथील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी ६ एप्रिलला होणार आहे.