लंडन (इंग्लंड) – ब्रिटनमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठू शकतो, अशी शक्यता बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गतीही मंदावणार आहे. हा एक ऐतिहासिक धक्का असेल, असे मत बँकेचे गव्हर्नर अॅन्ड्र्यू बेले यांनी व्यक्त केले.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली कच्च्या तेलाची किंमत पहाता युरोपमध्ये नैसर्गिक वायूचे मूल्य आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४ सहस्र डॉलर प्रति १ सहस्र घन मीटर एवढे झाले. युरोपियन युनियन आणि ब्रिटन यांनी युरोपीय देशांना ‘रशियाकडून तेल आणि वायू यांची खरेदी करू नये’, असे आवाहन युरोपीय देशांना आवाहन केले आहे. ब्रिटेन कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यासाठी रशियावर केवळ ८ टक्के अवलंबून असला, तरी युरोपीय देश मात्र तब्बल ४० टक्के अवलंबून आहेत.