हेलसिंकी (फिनलँड) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे शेजारी देश फिनलँड आणि स्वीडन हेसुद्धा नाटोचे (‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’चे) सदस्य बनण्याच्या प्रयत्नात आहेत. फिनलँडला आशा आहे की, १५ एप्रिलपर्यंत या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल. फिनलँडच्या पंतप्रधान सन्ना मरीन यांचे म्हणणे आहे की, रशिया आधीसारखा राहिलेला नसून उभय देशांमधील संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात पालट झाले आहेत. ‘नाटो’ने दोन्ही देशांच्या सदस्यत्व घेण्याच्या विचारावर सकारात्मकता दाखवली आहे. दुसरीकडे रशियाने मात्र दोन्ही देशांना असे पाऊल न उचलण्याची चेतावणी दिली आहे.