Pakistan Inflation : पाकिस्तानमध्ये रमझानच्या काळात अन्न आणि इंधन यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अधिकार्‍यांसमवेत बैठक घ्यावी लागली

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये अन्न आणि इंधन यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उपासमार, अन्नाचा तुटवडा आणि गॅस सिलिंडरची कमतरता, यांमुळे लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. विशेषतः कराचीमधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. रमझान महिन्यातही लोकांना दिलासा मिळालेला नाही. सरकारने पीठ आणि ब्रेड (पाव) यांचे मूल्य निश्चित केले; परंतु या वस्तू बाजारात  अधिक किमतीला विकल्या जात आहेत.

१. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रतिदिन पीठ आणि ब्रेड यांची किंमत निश्चित करावी लागते. या संदर्भात कराचीचे आयुक्त सय्यद हसन नक्वी यांनी एक अधिसूचना प्रसारित करून पिठाचे मूल्य निश्चित केले.

२. घाऊक विक्रीत पिठाचे प्रति किलो ८३ रुपये आणि किरकोळ विक्रीत प्रति किलो ८७ रुपये, असे मूल्य निश्चित करण्यात आले आहे; पण बाजारात बारीक पीठ ९० ते १०० रुपये, तर गिरणीचे पीठ ११० ते ११५ रुपये प्रति किलोने विकले जात आहे. १०० ग्रॅम रोटीची किंमत १० रुपये आणि १२० ग्रॅम ‘नान’ची (रोटीचाच एक प्रकार) किंमत १५ रुपये निश्चित करण्यात आली होती; परंतु लोकांना १८ ते २० रुपयांना रोटी, तर २५ ते २८ रुपयांना नान खरेदी करावा लागत आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील पाकप्रेमींना पाकमध्ये पाठवल्यास त्यांना भारताचे महत्त्व लक्षात येईल !