Inzamam ul Haq & Saqlain Mushtaq : पाकचे माजी क्रिकेटपटू इंझमाम उल् हक आणि सकलेन मुश्ताक यांची ‘हिंदु’ असल्याची स्वीकृती !

इंझमाम उल् हक याने त्याचे पूर्वज हरियाणातील असल्याची दिली माहिती !

इस्लामाबाद – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताक याने एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेच्या वेळी त्यांचे पूर्वज हिंदू असल्याची स्वीकृती दिली. सकलेन यांनी त्याच्या पणजोबाचे नाव रूड सिंह असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात पाकिस्तानचा दुसरा माजी क्रिकेटपटू आणि नंतर मौलाना (इस्लामचा अभ्यासक) बनलेला इंझमाम उल् हक याने त्याच्या भारतातील हरियाणातील हिसार शहराच्या संबंधांविषयी सांगितले. इंझमाम उल् हक म्हणाला की, त्याचे मूळ कुटुंब हिसारचे असून त्याच्या वडिलांनी हिसारमधील त्यांचा वाडा पाहिला आहे.

१.  सकलेन मुश्ताक म्हणाला की, अभिनेता कपिल शर्मा माझ्या गावचा आहे. मी अमृतसरचा आहे.  माझे आजोबा अमृतसरचे आहेत. रूड सिंह माझे पणजोबा होते. त्यांनी धर्मांतर केले आणि आम्ही मुसलमान झालो. त्यानंतर आम्ही पाकिस्तानमध्ये आलो.

२. इंझमामने सांगितले की, त्याच्या मानलेल्या आत्याचे नाव नाव पुष्पा होते. आता लोक असा प्रश्‍न असा विचारत आहेत की, अन्य धर्मियांचे धर्मांतर करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या इंझमामला पुष्पा आत्याची आठवण येत आहे ?

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू असणारे आणि नंतर पाकिस्तानचे क्रिकेट प्रशिक्षक बनलेले बॉब बुल्मर यांंना इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी इंझमाम आणि सकलेन या जोडीने कट रचला होता, असा आरोप केला जात होता.

संपादकीय भूमिका

भारतातील आणि पाकिस्तानतीलच नव्हे, तर अफगाणिस्तानसह बहुतेक इस्लामी देशांतील लोक पूर्वी हिंदूंचे होते. तलवारीच्या बळावर त्यांचे धर्मांतर करण्यात आलेले आहे. हे आता ते उघडपणे सांगू लागले आहेत. भविष्यात ते पुन्हा हिंदु धर्मांत आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !