
इस्लामाबाद – तोरखम सीमेवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. तालिबानने पाकिस्तानी सैन्यदलाच्या चौक्यांवर मोठे आक्रमण केले. या आक्रमणात ८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने अलीकडेच सीमेवर त्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. तालिबान सैन्य यावर संतप्त झाले आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल ‘लेजर’ शस्त्रांचा वापर करून हे आक्रमण केले. त्यामुळे तोरखम सीमेवर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या १२ दिवसांपासून तोरखम सीमा बंद आहे. तोरखम सीमा ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील सर्वांत महत्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू आहे. सीमा उघडण्यासाठी २ मार्चला दोन्ही पक्षांमध्ये बैठक झाली; पण ही बैठक अनिर्णित राहिली.