Pakistan Bomb Blast : पाकमध्ये मशिदीत शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळी बाँबस्फोट : ५ जण ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नौशेरा भागात एका मशिदीमध्ये शुक्रवार, २८ फेब्रुवारीच्या दुपारी नमाजपठणाच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. हा आत्मघातकी स्फोट असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतात असे झाले असते, तर यासाठी हिंदूंना उत्तरदायी ठरवून ‘भगवा आतंकवाद’ असे म्हटले गेले असते; मात्र पाकिस्तानसह अनेक इस्लामी देशांमध्ये मशिदीत मुसलमानांकडून अशा प्रकारचे स्फोट घडवले जातात, त्यावर जगातील एकही इस्लामी देश, इस्लामी संघटना, इस्लामी धर्मगुरु तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !