मृत्यूला घाबरू नका, युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या !

तुम्ही मृत्यूला घाबरू नका, तर युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या, असे मार्गदर्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याच्या कमांडर्सना दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आगार अव्वल : दिवाळी प्रवासी हंगामात ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न !

दिवाळीचा हंगाम यंदा इचलकरंजी आगाराला अनुकूल ठरला आहे. दिवाळीच्या प्रवासी हंगामात आगाराला ८९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळातही मिळालेल्या या उत्पन्नामुळे इचलकरंजी आगार कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी !

प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची विदेशी चलन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. १० घंटे ही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.

स्वातंत्र्यानंतर विकसित केलेल्या भारतीय रचनेला वैज्ञानिक क्षेत्रातील आईईई मानांकन प्राप्त !

पुणे येथील नारायणगाव जवळील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपला (जी.एम्.आर्.टी. ला) आईईई माईलस्टोन म्हणून मान्यता मिळाली आहे.

आखरी रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे ! – आखरी रस्ता कृती समितीचे आयुक्तांना निवेदन 

अशा मागण्या का कराव्या लागतात ? रस्त्यांची कामे चांगली करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य प्रशासन स्वतःहूनच पूर्ण का करत नाही ? 

शेतकरी आणि कामगार सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा नोंद

केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगारांनी निषेध व्यक्त केला.

आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सहकार्य करणार्‍या उमेदवारालाच साहाय्य ! – ब्रह्म महाशिखर परिषद

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची पुण्यात बैठक संपन्न झाली.

१०० युनिटपर्यंत वीज विनामूल्य देण्याचा ऊर्जामंत्र्यांचा पुनरुच्चार

१०० युनिटपर्यंत वीज विनामूल्य देण्याचा पुनरुच्चार ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या वर्षपूर्ती अहवालात केला आहे. राज्य सरकारला एक वर्ष होत असल्याने राऊत यांनी अहवाल सादर केला आहे.

कोरोनाची चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दिल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य निलंबित

चाचणी न करता अहवाल निगेटिव्ह दिल्याच्या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आधुनिक वैद्य सचिन नेमाडे यांना निलंबित केले आहे.