पुणे – द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सच्या (आईईईच्या) वतीने जगभरातील सर्वच क्षेत्रातील अद्वितीय तांत्रिक कामगिरीचा सन्मान करण्यात येतो. पुणे येथील नारायणगाव जवळील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपला (जी.एम्.आर्.टी. ला) आईईई माईलस्टोन म्हणून मान्यता मिळाली आहे. पूर्णपणे स्वदेशी अत्याधुनिक सुविधेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे एन्.सी.आर्.ए.चे संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी म्हटले आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या अंतर्गत जी.एम्.आर्.टी. या रेडिओ दुर्बिणीचे कार्यान्वयन करण्यात येते. देशाला आजवर मिळालेले हे तिसरे मानांकन असून याआधी जे.सी. बोस यांच्या रेडिओ लहरी संबंधीच्या संशोधनाला वर्ष १८९५ मध्ये तर रामन यांच्या संशोधनाला वर्ष १९२८ मध्ये हे मानांकन प्राप्त झाले होते.