शेतकरी आणि कामगार सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा नोंद

पुणे – केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगारांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात कामगार नेते कैलास कदम, इरफान सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर प्रशासनाच्या संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिला पोलीस शिपाई मीनाक्षी प्रभु राळे यांनी यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.