चिपी विमानतळाला भंगसाळ नदीचे पाणी देण्यास कुडाळ शहर सुधार समितीचा विरोध

भविष्यात कुडाळ शहर, तसेच येथील एम्.आय.डी.सी.मध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळास पाणीपुरवठा करू नये, असे निवेदन सुधार समितीचे सदस्य आणि शहरातील नागरिक यांच्या शिष्टमंडळाने दिले.

जॅक मा अज्ञातस्थळी देखरेखीखाली आहेत ! – चीनच्या सरकारी वृत्तपतत्रचा खुलासा

चीनमधील आणि जगातील मोठे उद्योगपती तथा ‘अलिबाबा’ समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा गेल्या काही मासांपासून सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने ते बेपत्ता असल्याचे वृत्त पसरले आहे.

पणजी येथे आज ज्येष्ठ पत्रकार रामनाथ देसाई यांचा सत्कार

गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि गोवा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने ६ जानेवारी या दिवशी सायंकाळी ४ वाजता मंडळाच्या सभागृहात ४ ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचे पोलीस संरक्षणात सर्वेक्षण

शासनाने प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम छुप्या पद्धतीने पूर्ण केले. ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला मान्यता देणार नसल्याचा दावा करून आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.

आज पत्रकार दिनानिमित्त वाशी येथे परिसंवादाचे आयोजन

दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारीला परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या उद्रेकामुळे भारत दौर्‍यावर येऊ शकत नाही !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे नियोजित भारत दौरा रहित केला आहे.

राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर

राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर पडली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे.

सरपंचपदाच्या निवडीसाठी होत असलेल्या लिलावाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल घेणार

सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !

कोरोनाचे लसीकरण ऐच्छिक असून लसीमुळे कोणताही धोका नाही ! – डॉ. शेखर साळकर

‘कोवेक्सीन’ या कोरोनाच्या लसीमुळे कुणालाही धोका उद्भवणार नाही; मात्र लसीविषयी कुणालाही शंका वाटत असल्यास त्याने संपूर्ण लसीकरण प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी लसीकरण प्रक्रियेतून बाहेर पडणे योग्य ठरेल.

गोव्यात अल्प कालावधीत सर्वांनाच लस देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात अल्प कालावधीत १०० टक्के लोकांना लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. राज्याचे क्षेत्रफळ लहान असल्याने, याचा लाभ लसीकरणाच्या वेळी होणार आहे.