‘ओह माय गॉड २’ चित्रपटावर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून आक्षेप !

चित्रपटातील काही संवाद आणि दृश्य यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या शक्यता !
पुनरावलोकन समितीच्या मान्यतेनंतरच चित्रपट होऊ शकणार प्रदर्शित !

खाणावळीत स्वयंपाक करतांना पतीने पत्नीला न विचारता २ टोमॅटोंचा वापर केल्याने पत्नी मुलीसह घर सोडून गेली !

सध्या देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोचा दर प्रतिकिलो १३० रुपयांच्या पुढे गेला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये चोरट्यांनी शेतात पिकलेले टोमॅटो चोरून नेले होते.

बेंगळुरू येथे बसमध्ये मुसलमान वाहकाला महिलेने गोल टोपी काढण्यास भाग पाडले !

‘तुमचा धर्म घरी किंवा मशिदीत पाळा’ या शब्दांत महिलेने सुनावले !

सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश स्थायी सदस्य देशांमध्ये नसतांना संयुक्त राष्ट्रे जगाचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात ? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्याचे स्थायी सदस्य देश जगाचे वास्तविक प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. ज्या उद्देशाने त्यांना स्थायी सदस्य म्हणून स्थापित करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यासाठी आज ते सक्षम आहेत का ? जगभरातील देशांच्या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व राहिले आहे का ?

१४ जुलैला प्रक्षेपित होणार ‘चंद्रयान-३’ !

‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !

ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयातील जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य करा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांना आवाहन !

म. गांधी यांनी स्वतःचे प्राण देऊन पाकला विनाशापासून वाचवले ! – इश्तियाक अहमद, पाकिस्तानी वंशाचे स्विडिश प्राध्यापक

म. गांधी यांनी पाकला विनाशापासून वाचवले; मात्र भारताला विनाशाच्या खाईत ढकलून दिले, असेच देशभक्तांना वाटते !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ ख्रिस्ती महिलांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि बलात्कार केल्याच्या प्रकरणी सैफ अलीला अटक

पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सैफच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाराप येथील पालकांचा निर्धार !

पालकांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?