मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांना आवाहन !
मुंबई – ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयातील जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्याविषयी सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्याकडे १३ जुलै या दिवशी केली. उप उच्चायुक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आदी क्षेत्रात गुंतवणुकीला वाव असून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. उप उच्चायुक्तांच्या शिष्टमंडळामध्ये जॉन निकेल आणि सचिन निकारगे यांचा समावेश होता.
ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आदी क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे सांगत थेट परकीय गुंतवणुकीत #महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी… pic.twitter.com/sIlt6KWo3j
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2023
महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.