वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी विस्तृतपणे चर्चा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

काही दिवसांपूर्वी भारतातील एका तरुणाच्या प्रेमात पडलेली एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह भारतात पळून आली होती. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने ‘धार्मिक शिक्षण आणि अध्यात्मिक साधना’ या कार्यक्रमाचे आयोजन !

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने राज्यातील हवेरी जिल्ह्यात असलेल्या कोडियाला होस्पेट या गावी तपोक्षेत्र पुण्यकोटी मठात ‘धार्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक साधना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) येथील भाजपच्या मोर्च्यावरील पोलिसांच्या लाठीमारात एका नेत्याचा मृत्यू

हा मोर्चा हिंसक झाला होता का ? मग पोलिसांनी एक नेता मरेपर्यंत लाठीमार का केला ? पोलिसांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी !

न्यायालयाकडून त्यांना १८ जुलै या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायालयाने त्यांना कलम १२० ब, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

थायलंडमध्ये होणार्‍या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी श्री हनुमंत असणार अधिकृत शुभंकर (मस्कॉट) !

बँकाक येथे होणार्‍या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी श्री हनुमंताला अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आशियाई अ‍ॅथलिटिक्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्रालयातील ६०२ क्रमांकाच्या कक्षात बसण्यास नकार !

अजित पवार यांनी घडलेल्या नकारात्मक घटना लक्षात घेत मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील ६०२ कक्षात बसण्यास नकार दिला. याविषयी अंनिसवाले आणि पुरो(अधो)गामी यांना काय म्हणायचे आहे ?