कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांच्‍यावर फौजदारी खटला प्रविष्‍ट करण्‍याचा न्‍यायालयाचा आदेश !

राज्‍याचे कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मध्‍ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्‍या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्‍याचे मान्‍य करत सिल्लोड येथील न्‍यायालयाने त्‍यांच्‍याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्‍याचे आदेश १२ जुलै या दिवशी दिले.

लव्‍ह जिहादविरोधी कायदा तात्‍काळ संमत करण्‍यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’ संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन !

या मागण्‍यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !

मी तडजोड करणार नाही ! – राज ठाकरे

मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्‍याच्‍या चर्चा चालू असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.

मुंबई पोलिसांच्‍या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

‘सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश’, असा त्‍यात उल्लेख असून या संपूर्ण कृत्‍याला उत्तरप्रदेश सरकार उत्तरदायी असल्‍याचे संदेशात म्‍हटले आहे.

स्‍टुडिओमध्‍ये गेलेल्‍या हिंदु मुलीचे कपडे उतरवून शरिराला स्‍पर्श करणारा धर्मांध पोलिसांच्‍या कह्यात !

हिंदूंनो, स्‍वसंरक्षण प्रशिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व जाणा !
हिंदूंनो, धर्मांध व्‍यावसायिकांची मानसिकता लक्षात घ्‍या !

गोहत्‍या थांबवण्‍यासाठी सोलापूर येथे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्‍हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करू नयेत, या मागण्‍यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

भाजपच्‍या १५२ जागा निवडून येतील ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या राज्‍याच्‍या निवडणुकांमध्‍ये भाजपच्‍या ८० टक्‍के म्‍हणजे १५२ जागा निवडून येतील. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि महायुतीचे २०६ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील.

पुणे महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यास लाच घेतांना अटक !

महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्‍यासाठी ‘मीटर रिडर’ कर्मचारी उमेश कवठेकर याला २५ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना अटक करण्‍यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागात केली.

हिंदुत्‍वनिष्‍ठ हरि पाटणकर यांचा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !

प्रवेश केल्‍यावर श्री. हरि पाटणकर म्‍हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ, मराठी माणसांच्‍या भल्‍यासाठी, महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी, तसेच अनेक आंदोलने करून सामान्‍य माणसाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असल्‍याने मी त्‍यात सहभागी होण्‍याचा निर्णय घेतला आहे.’’

वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.