१७-१८ जुलैला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  

मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस चालू झाला आहे. खेड येथील जगबुडी नदीची पातळी वाढली असून तिने आता धोक्याची पातळीही ओलांडली असल्याचे वृत्त आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !

बलुचिस्तानमध्ये पाक सैन्यावरील २ आक्रमणांत १२ सैनिक ठार  !

तसेच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सशस्त्र संघटनेचे ७ जण ठार झाले.

अहिल्यानगर येथे मदरशात हिंदु तरुणीवर अत्याचार, बळजोरीने धर्मांतर !

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांना अपकीर्त करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात ! मशिदी आणि मदरसे यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !

यमुना नदीला आलेल्या पुरामुळे देहलीत सर्वत्र पाणी !

हरियाणातील हथनीकुंड धरणातून सातत्याने सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे यमुना नदीला पूर आला आहे. १३ जुलैला तर पाण्याने २०८.६६ मीटरची पातळी गाठली होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले होते.

‘चंद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण !

हे यान आता २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ चंद्रावर उतरण्यास अपयशी ठरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले आहे.

‘चंद्रयान ३’ मोहीम भारतीय अवकाश संशोधनात ऐतिहासिक ठरेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.

सर्वोच्च न्यायालयाची विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थन करणार्‍या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकांच्या दृष्टीने आमची सिद्धता चालू ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी आल्यास त्यादृष्टीने आमची सिद्धता चालू आहे. या दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्यास काही प्रमाणात अधिक ‘ईव्हीएम्’ यंत्रे लागतील. एका ईव्हीएम् यंत्रात १५ राजकीय पक्षांची नोंद ठेवता येते.