गायीच्‍या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर !

गायीच्‍या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर देण्‍यात येणार आहे, असा निर्णय घेण्‍यात आल्‍याची माहिती दुग्‍धविकासमंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील यांनी दिली. दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्‍या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्‍पादक शेतकर्‍यांची आर्थिक हानी होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

अधिवेशनामध्‍ये कुणाला तक्रार करण्‍याची संधी मिळणार नाही, असे काम करू ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाच्‍या पूर्वसंध्‍येला १६ जुलै या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेच्‍या संदर्भात समिती स्‍थापन !

अमरावती जिल्‍ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्‍तावित मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेसंदर्भात साहित्‍य संस्‍कृती मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ६ सदस्‍यांची समिती स्‍थापन केली आहे.

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज् संस्‍थेच्‍या वतीने आयोजित व्‍यावसायिक प्रदर्शन आणि विक्री महोत्‍सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज्‌चे संस्‍थापक तसेच बळीराज सेनेचे अध्‍यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्‍यात आला.

फिरते हौद बंद करून मूर्तीदान केंद्राची संख्‍या वाढवण्‍याचा पुणे महापालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्‍या अशास्‍त्रीय गोष्‍टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्‍यापेक्षा पालिकेने भक्‍तांना वहात्‍या पाण्‍यात मूर्ती विसर्जनास प्रोत्‍साहन दिल्‍यास श्री गणेशाची कृपा होईल !

पन्‍हाळगड-पावनखिंड मार्गावर शिवभक्‍तांसाठी सुसज्‍ज निवास व्‍यवस्‍था उभारणार ! – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना

शिवभक्‍तांची ठिकठिकाणी रहाण्‍याच्‍या सुसज्‍ज व्‍यवस्‍थेसह विकास आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्‍हा सोलापूर) येथे झालेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनां’त करण्‍यात आली.

पुणे जिल्‍ह्यातील १६ अनधिकृत शाळा बंद करण्‍याची नोटीस !

जिल्‍ह्यातील ५३ विनापरवाना शाळांपैकी ३७ शाळा बंद करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांपैकी ४ शाळांच्‍या विरोधात शिक्षण विभागाने तक्रार प्रविष्‍ट केली असून शाळा बंद करण्‍याचे पत्र (नोटीस) पाठवले आहे. १६ शाळा अनधिकृत असून त्‍यांना ‘शाळा बंद’ करण्‍याचे पत्र पाठवले आहे.

गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीच्‍या व्‍यक्‍तींवर निवडणूक लढवण्‍याची बंदी कायमस्‍वरूपी हवी असल्‍याचा प्रस्‍ताव प्रलंबित !

गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्‍या व्‍यक्‍तींना सहा वर्षे निवडणूक लढवण्‍यासाठी बंदी आहे; मात्र ही बंदी कायमस्‍वरूपी घातली जावी, याविषयीचा निवडणूक सुधारणेतील प्रस्‍ताव अद्यापही प्रलंबित आहे, असे माजी केंद्रीय निवडणूक आयुक्‍त डॉ. नसीम झैदी यांनी सांगितले.

सोलापूर विद्यापिठात २४ जुलैला होणार ‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर यांचा सन्मान

वाटेकर हे कोकण इतिहास आणि संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरण, ग्रंथ चळवळ, पर्यटन, आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.