महाराष्‍ट्र विदेशी गुंतवणुकीत पुन्‍हा क्रमांक एक वर ! – मुख्‍यमंत्री

पालघर येथे ‘शासन आपल्‍या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यासाठी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षक नसल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी आंदोलने !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना  शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

भोर (पुणे) येथील धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात असलेले पांडवकालीन कांबरेश्‍वर मंदिर पाण्‍याबाहेर !

काहींच्‍या मते ते मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे. त्‍यामुळे ते पांडवकालीन आहे. १० मास हे मंदिर पाण्‍याखाली असते, तर फक्‍त २ मास हे मंदिर पाण्‍याच्‍या बाहेर असते.

छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौरांचा बूट चोरीला !

केवळ माजी महापौरांचा बूट चोरीला गेला म्‍हणून महापालिकेची यंत्रणा कामाला लावणे, हे अयोग्‍य आहे. या बुटाचा माजी महापौरांनीच स्‍वतः शोध घेणे अपेक्षित होते. महापालिकेची यंत्रणा जनतेच्‍या कामासाठी आहे, लोकप्रतिनिधींच्‍या वैयक्‍तिक कामासाठी नाही.

अमरावती येथे गोवंश संरक्षणासाठी महायज्ञ !

या दोन दिवसीय महायज्ञामध्‍ये प्रथम दिवशी आरंभी श्री महाकालीमाता, सर्व भक्‍तांची कुलदेवता यांचे पूजन, तसेच आवाहन करून गोमातेच्‍या मूर्तीचा दुग्‍धाभिषेक करून सर्व देवतांना आवाहन करण्‍यात आले.

सोलापूर विमानसेवेसाठी अडसर ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याची चिमणी पाडली ! 

सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिमणी पाडण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर सोलापूर महानगरपालिकेने कार्यवाही चालू केली होती. चिमणी पाडल्‍यानंतर शहराची नागरी विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सोलापूरवासियांमधून जोर धरू लागली आहे.

अल्‍पवयीन मुलाने चारचाकी चालवतांना झालेल्‍या अपघातात २ जण ठार !

१४ जूनला पहाटे अल्‍पवयीन मुलाने गंमत म्‍हणून वडिलांनी सेडन गाडी चालवायला घेतली. हा मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉईंटच्‍या दिशेने निघाला. गिरगाव चौपाटीजवळ नजीक कॅफे आयडियलजवळ दुचाकीला जोरात धडकल्‍याने अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्‍वर खान (३६) हे ठार झाले आहेत.

शेतमालाला भाव आणि नोकरी द्या, अन्‍यथा गोळ्‍या तरी घाला !

युवा शेतकर्‍यांनी गावातून फेरी काढली. त्‍यानंतर बैठकीत गावातील असंख्‍य युवकांनी स्‍वतःच्‍या स्‍वाक्षरीने पत्र लिहिले.

करमाळा (बीड) येथे मुकादमाने डांबून ठेवलेल्‍या मुलांची सुटका !

ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्‍यानंतरही ऊसतोड मुकादमाने कामगारांकडे पैसे शिल्लक असल्‍याचे सांगून मुलांकडून आणखी ३ मास काम करून घेतले.

नागपूरमधील मेयो रुग्‍णालयात महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात फिरणार्‍या धर्मांधाला अटक !

येथील मेयो रुग्‍णालयामध्‍ये महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात बुरखा घालून फिरणार्‍या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्‍यात आली. गेल्‍या १५ दिवसांपासून तो रुग्‍णालयात अधूनमधून महिलेच्‍या वेशात फिरत होता.