१०० युनिटपर्यंत वीज विनामूल्य देण्याचा ऊर्जामंत्र्यांचा पुनरुच्चार

१०० युनिटपर्यंत वीज विनामूल्य देण्याचा पुनरुच्चार ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या वर्षपूर्ती अहवालात केला आहे. राज्य सरकारला एक वर्ष होत असल्याने राऊत यांनी अहवाल सादर केला आहे.

कोरोनाची चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दिल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य निलंबित

चाचणी न करता अहवाल निगेटिव्ह दिल्याच्या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आधुनिक वैद्य सचिन नेमाडे यांना निलंबित केले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतांना कुणावर कायदेशीर कारवाई करतांना राग किंवा द्वेष यांतून करणार नाही, अशी त्यांनी शपथ घेतली आहे. हात धुवून मागे लागू, खिमा करू, अशी भाषा नाक्यावर वापरली जाते. अशा प्रकारे चिरडण्याची भाषा करणारे फार टिकले नाहीत.

इस्कॉनच्या मिरज येथील नियोजित वास्तूचे भूमीपूजन !

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन श्री श्री राधा गोपाल मंदिर आरवडे यांच्या मिरज येथील शाखेच्या नियोजित वास्तूचे २८ नोव्हेंबर या दिवशी भूमीपूजन करण्यात आले.

लहान मुलांना घेऊन लोकल रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यास मनाई 

सद्यस्थितीत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिवक्ता, डबेवाले यांसह महिलांना लोकल रेल्वे गाड्यांतून प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना घेऊन प्रवास करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वे प्रशासनाला आढळून आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना कह्यात घेतले

भ्रष्ट अधिकार्‍यांना कह्यात घेणे, चौकशी करणे आदी जुजबी कारवाई करून न थांबता अशा भ्रष्टाचार्‍यांकडून भ्रष्टाचाराचा सर्व पैसा वसूल करावा !

२८ नोव्हेंबरपासून प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन !

कार्तिकी यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २५ ते २७ नोव्हेंबर असे ३ दिवस पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद करण्यात आले होते

राज्यपालांची संमती मिळाल्याने उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू

केंद्र सरकारनेच असा कायदा संपूर्ण देशासाठी करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !

कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच माणगाव हायस्कूल चालू केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आरोग्य धोक्यात 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांनी माणगाव हायस्कूल चालू केले.

गोव्यातही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गोव्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.