इस्कॉनच्या मिरज येथील नियोजित वास्तूचे भूमीपूजन !

इस्कॉनच्या मिरज येथील शाखेच्या नियोजित वास्तूच्या भूमीपूजनप्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच मान्यवर

मिरज, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन श्री श्री राधा गोपाल मंदिर आरवडे यांच्या मिरज येथील शाखेच्या नियोजित वास्तूचे २८ नोव्हेंबर या दिवशी भूमीपूजन करण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री. अभिराम ठाकूरदास, श्री. गौरकृष्ण दास, भाजप आमदार श्री. सुरेश खाडे आणि श्री. सुधीर गाडगीळ, तसेच मान्यवर उपस्थित होते.