रिंकू शर्मा यांची हत्या करणार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या !

जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.

हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून धर्मांधांकडून महंत मुनि बजरंग दास यांच्यावर प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना सातत्याने हिंदूंचे संत, महंत आणि पुजारी यांच्यावर आक्रमणे होत आहेत, तसेच हत्या होत आहेत. हे हिंदूंना अपेक्षित नाही ! आता प्रशासनाने धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत !

हिंदूंच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट रचणार्‍या पी.एफ्.आय.च्या दोघा आतंकवाद्यांना अटक

मागील अनेक घटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहाद्यांनी अनेक समाजविघातक कारवाया केल्याचे उघड झाले असतांना केंद्र सरकारने अद्याप तिच्यावर बंदी न घालणे हिंदूंना अपेक्षित नाही !

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती  

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शिवभक्तांनी स्वत:ची काळजी घेत शिवजयंती साजरी करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी प्रथम जनतेची काळजी घेतली असती. त्याप्रमाणे नागरिकांची काळजी घेणे आपले स्वत:चे आणि शासनाचे दायित्व आहे.

सातारा येथील शासकीय निवासस्थानातील घरांची दारे, खिडक्या आणि चौकटी यांची चोरी

शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ?

(म्हणे) ‘भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही !’ – शेतकरी नेते राकेश टिकैत यांची टीका

समाजविघातक शक्तींना शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेणारे, देशद्रोही खलिस्तानवाद्यांच्या जिवावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरणारे कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांविषयी काही बोलणे, हेच मुळात हास्यास्पद आहे !

कोरोनाची दुसरी लाट आल्यास सावरायलाही वेळ मिळणार नाही !

‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.