कोरोनाच्या आपत्तीच्या काळातही रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करण्याची एकही संधी न सोडणारी खासगी रुग्णालये !
वाशिम – कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पीपीई किटमध्ये बांधण्यासाठी येथील एका खासगी रुग्णालयाने ८०० रुपयांची मागणी केली आहे. ‘पैसे दिले नाहीत, तर मृतदेह बांधून दिला जाणार नाही’, अशीही अरेरावी रुग्णालयाकडून करण्यात आली. याप्रकरणी नातेवाइकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. रुग्णालय प्रशासन या विषयावर आता काहीही बोलण्यास सिद्ध नाही.