‘मानव सेवा संघा’च्या जिल्हाध्यक्षपदी दीपाली गोडसे

माजी उपनगराध्यक्षा आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका दीपाली गोडसे यांची ‘मानव सेवा संघा’च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपी निकिता जेकब हिला अंतरिम जामीन संमत

देहली येथील शेतकरी आंदोलनाचे ‘टूलकिट’ शेअर केल्याच्या प्रकरणातील आरोपी निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन संमत केला आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथून २९ किलो गांजा शासनाधीन

वाई (जिल्हा सातारा) येथील नंदनवन वसाहतीमधील एका बंगल्यामध्ये गांजाची शेती केली जात होती. पोलिसांंनी या बंगल्यावर धाड टाकली. त्यांना तिथे २९ किलो गांजा आणि २ जर्मन नागरिक आढळून आले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ८० वर्षांचे जिवाजी साळुंखे यांना १० वर्षे सक्तमजुरी

मुली आणि महिला यांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढणे हे समाज दिवसेंदिवस अधोगतीला जात असल्याचे लक्षण आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे हाच उपाय आहे !

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुंड शरद मोहोळसह ५ जण कह्यात !

आदेशाचे पालन न करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी तरच समाजव्यवस्था सुधारेल !

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा नोंद

कुख्यात गुंड गजानन मारणेने कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढण्याच्या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवले !

राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास देश प्रगती करेल ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

१७ फेब्रुवारी या दिवशी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस्.एन्.डी.टी.) महिला विद्यापिठाच्या ७० व्या वार्षिक दीक्षांत समारोह सोहळ्यात मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

बारामती (पुणे) येथील ए.टी.एम्.च्या रकमेत ३ कोटींचा अपहार

सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लि. विविध अधिकोशांच्या ए.टी.एम्.मध्ये रक्कम भरण्याचे काम करते. संबंधित ए.टी.एम्.ला खोट्या नोंदी करून कॅश बॅलन्सिंग रिपोर्टमध्ये त्या रकमा दाखवून आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.