सोलापूर, १ एप्रिल (वार्ता.) – येथील पंचमुखी हनुमान देवस्थान येथे होळीनिमित्त पुरोहित नागराज शास्त्री आणि शिवराम शास्त्री यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने होळी हा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी वातावरणामध्ये सात्त्विकता यावी, यासाठी दशांग वनस्पती, तसेच भीमसेनी कापूर, वेलची, गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोवर्या यांचा वापर करण्यात आला होता. या वेळी श्री. आणि सौ. बारूका, यादगिरी बोम्मा, सत्यनारायण गुर्रम, सदानंद गुंडेटी आदी मान्यवर उपस्थित होते.