दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
अमरावती – मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने ३ एप्रिल या दिवशी फेटाळला. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते, तसेच असेच पत्र त्यांनी श्रीनिवास रेड्डी यांना लिहिले होेते. त्यानंतर विनोद शिवकुमार यांना पोलिसांनी अटक केली होती.