अमरावती – मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च या दिवशी केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे करणार आहेत. वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी ३ एप्रिल या दिवशी आदेश काढले. ‘या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी. यासाठी महिला पोलीस आय.पी.एस्. अधिकार्यांकडून अन्वेषण करण्यात यावे’, अशी मागणी भाजप, वनरक्षक, वनपाल, रेंजर फॉरेस्ट असोसिएशन यांनी केली होती. शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे या प्रकरणाचे अन्वेषण सोपवले.