(म्हणे) ‘रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेलात, तर आमचे दायित्व नाही !’

जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा !

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली.

माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

हिंदुत्वनिष्ठ नसलेल्या पक्षाचा आमदार लव्ह जिहादविषयी पोटतिडकीने सांगत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

बेंगळुरूमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडून अवैधरित्या घेतले जात आहेत ३५ ते ४० सहस्र रुपये !

भारतियांच्या नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे दाखवणारी ही लज्जास्पद घटना ! अशांना अटक करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा दिली पाहिजे !

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात कठोर कायदा होणे आवश्यक ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, हरियाणा

सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्‍चितपणे धर्मांतर रोखले जाऊ शकते, असे प्रतिपादन फरीदाबादमधील (हरियाणा) वल्लभगड येथील अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज यांनी केले.

कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी !

राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !

पनवेल येथे कोरोनाची लसच उपलब्ध नाही !

लसीकरण कधी चालू होणार, हे येथील आरोग्य विभागालाही सांगत येत नाही.

औषध आस्थापनांना केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला औषध न देण्याची सूचना !

नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावेत ! – केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

सरसंघचालक मोहन भागवत यांना रुग्णालयातून सोडले

‘पॉझिटिव्ह’ होण्याच्या काही दिवसांपूर्वी डॉ. भागवत यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता.

संभाजीनगर येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी इंजेक्शनचे वितरण करणार !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्यानंतर निर्णय घेणारे कचखाऊ प्रशासन !