कराड (जिल्हा सातारा) येथे विनामास्क फिरणार्‍या ८० जणांवर दंडात्मक कारवाई !

विनाकारण आणि विनामास्क शहरात फिरणार्‍या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण चाचणीचा अहवाल लवकर द्या !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईच्या आयुक्तांना आदेश !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज रहा ! – मुख्यमंत्री

कोरोनाच्या किती किती लाटा येतील ? ते आज सांगू शकत नाही; मात्र आता राज्यातील उद्योगांनीसुद्धा येणार्‍या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ एप्रिल या दिवशी केले आहे.

मुंबईमध्ये संपूर्ण दळणवळणबंदी करायला हवी ! – महापौर, मुंबई

कुंभमेळ्याहून परतणार्‍या भाविकांना ‘क्वारंटाईन’ करणाचा विचार

अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या कारणास्तव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक १७ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आले. प्रशासनाने सकाळी बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांना बाहेर काढून बस स्थानकाच्या दोन्ही दारांवर ‘बॅरिकेड्स’ लावले.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात विदर्भावर अन्याय झाला आहे ! – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड भेदभाव चालू आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या काही नेत्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पळवला आहे, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे केला.

शिरूर (जिल्हा पुणे) येथील बनावट डॉक्टरने ‘औषध दुकानासाठी जागा देतो’, असे सांगून फसवले !

श्री मोरया मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील बनावट डॉक्टर मेहबूब शेख याने रुग्णालयाच्या इमारतीतील एक गाळा औषधाचे दुकान काढण्यासाठी देतो, असे सांगून चंदन नारखेडे यांना फसवले आहे. डिपॉझिट म्हणून ३० लाख रुपये घेऊन त्यातील २४ लाख रुपये परत न देता फसवणूक केली आहे.

ह.भ.प. मंगलाताई कांबळे (वय ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन !

ह.भ.प. मंगलाताई कांबळे (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या ह.भ.प. मंगलाताई या अतिशय देवभक्त होत्या. समाजप्रबोधन आणि जनजागृती यांसाठी त्यांनी कीर्तनकार-प्रवचनकार होऊन परदेशातही धर्म-अध्यात्माचा प्रसार केला.

जगद्गुरु डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे देहावसान

राज्यातील नर्मदा कुंभमेळ्याचे संस्थापक जगद्गुरु डॉ.  श्याम देवाचार्य महाराज (वय ६८ वर्षे) यांचे कोरोनामुळे देहावसान झाले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते कुंभमेळ्यासाठी गेले होते.

दळणवळण बंदीमुळे सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा वेळापत्रकात पालट !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी लागू केली आहे. त्यामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा वेळापत्रकात पालट करण्यात आला आहे.