
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आले आहे. ९ एप्रिल या दिवशी डॉ. भागवत यांच्या शरिरात सर्दी आणि खोकला अशी कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर लगेचच त्यांना ‘किंग्स वे’ या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचे सर्व अहवाल सामान्य आले. त्यानंतर त्यांना सुुट्टी देण्यात आली.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘पॉझिटिव्ह’ होण्याच्या काही दिवसांपूर्वी डॉ. भागवत यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. पुढील ५ दिवस गृह अलगीकरणात रहाण्याची सूचना आधुनिक वैद्यांनी त्यांना केली आहे. विश्रांतीसाठी ते संघ मुख्यालयात आले आहेत. पुढील काही दिवस ते येथेच विश्रांती घेणार आहेत.
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !