माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

हिंदुत्वनिष्ठ नसलेल्या पक्षाचा आमदार लव्ह जिहादविषयी पोटतिडकीने सांगत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

थिरूवनंतपूरम् (केरळ) – माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. यात १२ हिंदु आणि ३५ ख्रिस्ती आहेत. त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले कि त्यांना कुठे नेण्यात आले ? हे मात्र मला ठाऊक नाही. मी लव्ह जिहादसाठी धर्माला दोष देत नाही; मात्र देशात धर्मांध आहेत, असे विधान केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे आमदार पी.सी. जॉर्ज यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी देशाला जिहादी आतंकवाद्यांपासून वाचवण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती.

पी.सी. जॉर्ज पुढे म्हणाले की, मी बर्‍याच काळापासून लव्ह जिहाद अत्यंत जवळून पहात आहे. यांतील बहुतेक प्रकरणे एराटुपेटा येथील आहेत. बळी पडलेल्या मुली तक्रार करत नाहीत किंवा न्यायालयातही जात नाहीत. या मुलींचे कुटुंबीय आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहेत.