श्रीकृष्णजन्मभूमीचेही उत्खनन करण्यात यावे !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. सरकारनेच ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करून इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक वास्तूंवर जे अतिक्रमण केले आहे, ते हटवून हा समृद्ध वारसा हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

राज्यांनी दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय ठेवावा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज नवरात्रीचा शेवटचा दिवस. उद्या रामनवमी आहे. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. त्यामुळे तुम्हीही मर्यादांचे पालन करावे, हाच श्रीरामाचा संदेश आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिलच्या रात्री देशवासियांना दिला.

अरबी समुद्रातील नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाने अरबी दमुद्रात मासे पकडण्याच्या नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या नौकेतून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.

कर्नाटकमधील प्रसिद्ध गोकर्ण मंदिराचे व्यवस्थापन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीकडे !

कर्नाटकातील प्रसिद्ध गोकर्ण महाबलेश्‍वर मंदिराचे प्रशासन आता निवृत्त न्यायमूर्ती बी.एन्. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील समिती पहाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचा अंतरिम आदेश दिला आहे.

‘भक्तराज बोधामृत’ या ‘अ‍ॅप’चा आज रामनवमीच्या शुभमुहुर्तावर आरंभ !

‘श्री रामचंद्रदेव ट्रस्ट एवं पू. भक्तराज महाराज समाधी मंदिर, कांदळी’ यांच्या वतीने रामनवमीच्या शुभमुहुर्तावर, म्हणजे २१ एप्रिल या दिवशी ‘भक्तराज बोधामृत’ या ‘अ‍ॅप’चा आरंभ करण्यात येत आहे.

२१ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १५ दिवसांच्या दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता

२० एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्यासाठी मंत्रीमंडळाचे एकमत झाले आहे. बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आधुनिक वैद्य आणि परिचारिका आता पूर्णपणे थकलेले आहेत ! – डॉ. संजय ओक, प्रमुख, कोविड फोर्स

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी जनतेने आतातरी ईश्‍वराची भक्ती करावी. ईश्‍वरच तुम्हाला यातून तारेल !

पुण्यातील आरोग्य सेवांमधील अडचणींमुळे पालिकेविरोधात शिवसेनेचे आंदोलन !

अशी आंदोलने का करावी लागतात ? प्रशासन स्वतःहून यावर कृती का करत नाही ?

१० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ ! – शिक्षणमंत्री

१० वीच्या परीक्षा रहित करण्यात आल्या असल्या, तरी विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल ? याविषयी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ? यांचा विचार केला जाईल.