महाराष्ट्र सरकारकडून ‘विर्डी’ धरणाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  जयघोषाने दुमदुमली सावंतवाडी !

‘‘यात्रेत हिंदूंनी दाखवलेला सहभाग विरोधक आणि सावरकर यांच्यावर टीका करणार्‍यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कुणीही स्वा. सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द काढण्याचे धाडस करणार नाही.’’

गोवा : कळंगुट-कांदोळी किनार्‍यावरील  अवैध शॅक्सना टाळे ठोकण्यास प्रारंभ

अनुज्ञप्ती न घेताच १६१ शॅक्स उभे राहीपर्यंत त्यावर कारवाई न करणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता कि शॅकवाल्यांशी साटेलोटे ?

धर्मांधाकडून कामगाराची २ लाख रुपयांची फसवणूक !

बारामती येथे मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन कामगाराची २ लाख ६५ सहस्र रुपयांची फसवणूक करण्याची घटना घडली. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

‘डी.एड्.’ कायमचे बंद होऊन ‘बी.एड्.’ करणे बंधनकारक !

केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापिठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार आहे.

‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्र’ हे धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत’ हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट्स’ आहे’, असे सांगून एक मतप्रवाह निर्माण करत आहेत.

#Exclusive : फोंडा (गोवा) येथील कदंब बसस्थानक : एक दुर्लक्षित वास्तू !

सरकारमधील १२ पैकी ४ मंत्री फोंडा तालुक्यातील आहेत. तरीही ‘फोंडा येथील कदंब बसस्थानक एक दुर्लक्षित वास्तू राहिली आहे.’ सरकार कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प उभारते; मात्र अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची डागडुजी करण्यात सरकारला रस का नसतो ?

पुणे येथील मिळकतधारकांना ४० टक्के सवलत देण्याचा आदेश न आल्याने मिळकत देयके देण्यास विलंब !

महापालिकेकडून वर्ष १९७० पासून मिळकतधारक स्वत: रहात असल्यास ४० टक्के सवलत दिली जाते. यामुळे महापालिकेची आर्थिक हानी होत असल्याने महालेखा परीक्षकांकडून (कॅग) आक्षेप नोंदवण्यात आला होता.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन पंचांच्या साक्षी !    

या प्रकरणी ३ एप्रिलला सरकार पक्षाच्या वतीने मुंबई येथील पंच विजयकुमार नार्वेकर, तर कोल्हापूर येथील पंच सुनील जाधव यांची साक्ष नोंदवण्यात आली.

संत बाळूमामा देवस्थानचे (जिल्हा कोल्हापूर) संचालक आणि सरपंच यांच्यात कोल्हापूर शहरात मारामारी !

‘श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००३ मध्ये करण्यात आली. यातील १८ संचालकांपैकी ६ संचालकांचे निधन झाले असून सध्या १२ संचालक कार्यरत आहेत.