आद्यशंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने करवीरपिठाच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण !

धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्‍या, तसेच विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या मान्यवरांना करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कोल्हापूर येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा पार पडला !

संध्यामठ, छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा ३ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला.

मध्यप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, मुले आणि त्यांचे पालक यांनी हा चित्रपट अवश्य पाहिला पाहिजे.

पुनःपुन्हा न्यायालयात याचिका करणार्‍याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारत १० सहस्र रुपयांचा ठोठावला दंड !

सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीला निकाली काढण्यात आलेल्या  विषयांवर परत परत याचिका प्रविष्ट केल्यामुळे फटकारले. तसेच तिला १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. ‘अशा प्रकारच्या याचिका प्रविष्ट करणे वेळेचा अपव्यय करण्यासारखे आहे’, असे न्यायालयाने म्हटले.

चेन्नईमध्ये इस्लामी संघटनेने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे फलक फाडले

इस्लामिक स्टेट आणि लव्ह जिहादची भीषणता दाखवल्यावर धर्मांध मुसलमान आणि त्यांच्या संघटना यांना मिरच्या झोंबणारच !

कोची (केरळ) येथे ५० पैकी केवळ १७ ठिकाणीच ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित

केरळमध्ये कायद्याचे राज्य आहे का ? जर चित्रपटगृहाच्या मालकांना भीती वाटत असेल, तर ते राज्यातील साम्यवादी आघाडी सरकारचे अपयश आहे. सरकारने अशांना संरक्षण पुरवणे आवश्यक आहे !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट ‘इस्लामिक स्टेट’वर आहे, याला विरोध करणारे आतंकवादी आहेत ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामिक स्टेटविना कुणालाही वाईट किंवा चुकीचे म्हणत नाही, असे देशातील सर्वांत उत्तरदायी संस्था असणारे उच्च न्यायालय असे म्हणत असेल, तर त्याचे म्हणणे बरोबर आहे. इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना आहे.

समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात हा प्रकार वाढीस लागेल ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला शाखा

समलिंगी विवाह म्हणजे एक विकार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी केलेले सर्वेक्षण !

(म्हणे) ‘संयुक्तपणे आतंकवादाचा उपद्रव नष्ट करूया !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

आतंकवादी निर्माण करणारा कारखाना असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आतंकवादाचा उपद्रव नष्ट करण्याची भाषा करतात याहून दुसरा विनोद कोणता असू शकतो ?

ढवळी येथील भंगारअड्ड्याला भीषण आग : लाखो रुपयांचे भंगार भस्मसात

डिचोलीतील उपजिल्हाधिकारी ४२ घंट्यांमध्ये ३ भंगारअड्डे हटवू शकतो, तर फोंडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी असे का करू शकत नाहीत ?