‘नारा-ए-तकबीर (अल्ला महान आहे), अल्लाहू अकबर’ (अल्ला सर्वोच्च आहे) अशी घोषणाबाजी
चेन्नई (तमिळनाडू) – ‘द केरल स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला काही ठिकाणी विरोधही केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ चेन्नई येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काही जण चित्रपटगृहाबाहेरील या चित्रपटाचे मोठे कापडी फलक फाडतांना दिसत आहे. तसेच या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातामध्ये तमिळनाडूतील इस्लामी संघटना ‘तमिळनाडू मुस्लिम मुनेत्र कळघम्’चा (टी.एम्.एम्.के.चा) झेंडा दिसत आहे. अन्य एका व्हिडिओमध्ये याच संघटनेचे कार्यकर्ते चित्रपटाची भित्तीपत्रके फाडतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ राज्यातील कोइम्बतूर शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाला इस्लामी संघटना आधीपासून विरोध करत आहेत. जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात जाऊन चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती.
'अल्लाह-हू-अकबर, नारा-ए-तकबीर' बोल फाड़े 'The Kerala Story' के पोस्टर: वीडियो देख नेटीजन्स बोले- ISIS पर बनी फिल्म से ये क्यों हुए आहत#TheKeralaStoryhttps://t.co/f0RFbWvirm
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 5, 2023
या व्हिडिआेंवर सामाजिक माध्यमांतून एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया व्यक्त करतांना, जर हा चित्रपट इस्लामिक स्टेटच्या विरोधात आहे आणि इस्लाम अन् इस्लामिक स्टेट यांच्यात काहीच संबंध नाही, तर लोकांना त्याचा त्रास का होत आहे ?, असा प्रश्न विचारला आहे.
संपादकीय भूमिकाइस्लामिक स्टेट आणि लव्ह जिहादची भीषणता दाखवल्यावर धर्मांध मुसलमान आणि त्यांच्या संघटना यांना मिरच्या झोंबणारच ! तमिळनाडूमधील मुसलमानप्रेमी द्रमुक सरकार अशांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकळीकच देणार असल्याने अशा घटना थांबवण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने सरकारवर दबाव आणणे आवश्यक ! |