कोची (केरळ) येथे ५० पैकी केवळ १७ ठिकाणीच ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित

चित्रपटाला होणार्‍या विरोधामुळे चित्रपटगृहाच्या मालकांची माघार !

कोची (केरळ) – ‘द केरल स्टोरी’ चित्रपट ५ मे या दिवशी देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे; मात्र केरळमधील कोची शहरात अनेक चित्रपटगृहांच्या मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये चित्रपटाला होत असलेल्या विरोधामुळे काही चित्रपटगृहांनी चित्रपटाचे खेळ (शो) रहित केले आहेत. शहरातील ५० ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होणार होता; मात्र प्रत्यक्षात केवळ १७ ठिकाणीच चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहे.

शहरातील ‘लुलू’ मॉलमधील (मोठ्या व्यापारी संकुलातील) पीव्हीआर आणि ओबेरॉन मॉल आणि सेंटर स्क्वेअर मॉलमधील ‘सिनेपोलिस’ चित्रपटगृहांनी चित्रपटाचे  प्रदर्शन रहित केले आहे. याचे कारण त्यांनी दिलेले नाही. अचानक खेळ रहित केल्याने प्रेक्षक संतापले आहेत.

संपादकीय भूमिका 

केरळमध्ये कायद्याचे राज्य आहे का ? जर चित्रपटगृहाच्या मालकांना भीती वाटत असेल, तर ते राज्यातील साम्यवादी आघाडी सरकारचे अपयश आहे. सरकारने अशांना संरक्षण पुरवणे आवश्यक आहे !