कोल्हापूर – श्रीमद्जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या आद्यशंकराचार्यांचा २ सहस्र ५३१ वा जयंती उत्सव ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होत आहे. यात ४ मे या दिवशी धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्या, तसेच विविध क्षेत्रात कार्य करणार्या मान्यवरांना करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ५ मे या दिवशी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, पालखी प्रदक्षिणा सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये गोवा येथील सुशांत वासुदेव वझे, रामटेक येथील मधुसुदन पेन्ना, ठाणे येथील अशोक गणेश उपाध्ये, औदुंबर येथील प्रदीप जोशी, बीड येथील आधुनिक वैद्य दिलीप देशमुख, गोवा येथील वंदना प्रदीप जोशी, नांदेड येथील विश्वंभर कानशुक्ले यांचा समावेश असून बीड येथील वेदव्रत जोशी आणि परभणी येथील प्रमोद कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.