पुनःपुन्हा न्यायालयात याचिका करणार्‍याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारत १० सहस्र रुपयांचा ठोठावला दंड !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीला निकाली काढण्यात आलेल्या  विषयांवर परत परत याचिका प्रविष्ट केल्यामुळे फटकारले. तसेच तिला १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. ‘अशा प्रकारच्या याचिका प्रविष्ट करणे वेळेचा अपव्यय करण्यासारखे आहे’, असे न्यायालयाने म्हटले.
या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते आणि त्याविरोधात तिने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर वर्ष २००४ मध्ये निर्णय दिला होता. आता या व्यक्तीने परत याविषयी याचिका प्रविष्ट करून तिच्यावर अन्याय झाल्याचे म्हणत पुन्हा सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यावरून न्यायालयाने तिला फटकारले.